उद्यापासून बारावीच्या परीक्षेस सुरुवात

Foto
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने उद्यापासून (दि.१८) विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरूवात होणार आहे. ही परीक्षा १८ मार्च पर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेला विभागातून १ लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी बोर्डाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. भरारी पथकही सज्ज झाले आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण १ लाख ७१ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात १ लाख ६ हजार १४१ मुले तर ६५ हजार ८१८ मुली परीक्षा देणार आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण १४२ परीक्षा केंद्रावर ६२ हजार ७१२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर बीड जिल्ह्यातील ९७ परीक्षा केंद्रावर ४० हजार ६५१ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. जालना जिल्यातून ७३ परीक्षा केंद्र निश्चित केले असून या जिल्यातून ३० हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. याशिवाय परभणी जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रावर २४ हजार ४५४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. याशिवाय हिंगोली जिल्यातून ३३ परीक्षा केंद्रावर १३ हजार २४८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

भरारी पथकाची राहणार नजर
बारावी परीक्षेत काही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक सज्ज झाले आहेत. यात कॉपीमुक्त अभियान उधळून लावणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी भरारी पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी पथक, निरंतर भरारी पथक, आंग्लभाषा पथक, उपशिक्षणाधिकारी पथक, महिला अधिकारी पथक सज्ज झाले असून परीक्षा केंद्रावर यांची कडक नजर राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा द्यावी, परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहावे. याशिवाय परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थी, पालकांव्यतिरिक्त इतरांनी वावर करू नये. याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक राहणार आहे.  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker